अश्मयुगानची बात ह..जवा मानुस निसता कनदमुला खावाचा. जंगलान खोपटा नय त गुफेन रवाचा. कईक जनावरा त्याला दिसाची, कईक पाखरा दिसाची. ती रोज येके झाराला येवुन चाटत बसाची.
या ते आदिमानवानी बगला. रोज त्याव तो इचार कराला लागला. येक दिस फिरला त्याचा डोका न जनावरांचे आंगाव कई बी फेकला ना त्यानी तनशी त्यांना हाकलला. तो पुन ते झारा जवल जेला.
तया त्याला जुरुक दगर दिसलं ती त्यानी चाटली ना तवा त्याला वेगला कसा तरी लागला त्या. पन त्याला ती चव पटली ना ती चव होती ‘मीठाची' ना तो दगर नवता त खनिज वता.
ते मानसाचा काम कई सादा नवता. त्यानी तो आखा दगर त्याचे खोपट्यान नेला. म कनदा खाता खाता त्यापुन खावाला लागला. येक दिस तो दगर खपला म यो परत ते झारा जवल जेला पुन त्याला कई ती चव भेटत नवती.
याचा फिरला डोका ना यो तसाच दगर गवसा साठी आखे जंगलान फिरला. मगशी याला यक वेगलीच माती दिसली ती होती वालु. ना ते वालुवं होता पाणी नदर खपोस्तोवर.
यो परला ते पान्यान ना त्याचे नाकातोंडान पानी जेला. आंगाला पका झोंबाला लागलेला. जंगलान कनची बिनचं काटं रुपलेलव न पायान दगरा बिगरा लागलीवी पुन यो मानुस पयले पुन तल्याचे पान्यान जेलता तवा त्याला कई झोंबला नवता. आज कसा झोंबाला लागला त्याचा यो इचार करतुता तवा त्याचे तोनडान जेलेले पान्याची चव त्यानी वलखली.
याच त गवसत वता तो. पन या खोपट्यान नेवाचा कसा ये साठी तो डोकाफोरी कराला लगला. तवा त्यानी आयरीया केली. दर्याचे किनारी बारका खड्डा केला तल्यासारखा ना त्यान तो पानी साचोला सुरयाचे उनाशी ते पान्याची वाफ होली ना रेला फक्त ‘मीठ'. मगशी त्यानी आशी पक्की मीठाची आगरा बांधली.
ना जगानी त्याचे ये महान भरीव कामगिरीला उपमा दिली ‘आगरी'……..तो व्हता पयला आगरी ज्यानी मीठाचा शोध लवला.

