लग्न सराई आली म्हणजे उखाणे सुरु. आणि लग्न म्हणजे प्रत्येक मुलीच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण. आणि या क्षणाला घेतला जाणारा उखाणा आपण आयुष्यात शेवटपर्यंत कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच आज मी तुच्यासाठी घेऊन आलो आहे एकापेक्षा एक जबरदस्त उखाणे. तर read करा हा blog – “Marathi ukhane for Females” (नवरी साठी उखाणे).
Marathi Ukhane for Bride:
एका योग्य जीवनसाथी सोबत लग्न व्हायला नशीब लागत. कारण लग्नासोबत फक्त दोन शरीराचीच नाही तर दोन हृदयाचं सुद्धा मिळण होत. अशा या जीवांसाथीला तुमच्या प्रेमाची भुरळ पडेल असे काही उखाणे आज मी तुम्हाला देणार आहे. तर चला सुरू करूयात.
गुळाची गोडी अन् फुलांचा सुगंध,
…. रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
“Gulachi Godi An Fulancha Sugand
….Ravanchya Sansarat, Swargacha Aanand.“
उमराच्या झाडाखाली दत्ताची साउली …रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.
रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
… रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.
यामिनीच्या अंगावर चांदण्याचा शेला …रावांनी माझ्या हाती सौभाग्यकलश दिला.
मुलगा माझा कंठमणी, मुलगी माझी तन्मणी
…रावांच्या हृदयाची मी आहे स्वामिनी.
टाळ वाजे वीणा वाजे वाजे पखवाज गं,
.मैत्रेयीच्या सहवासांत गाजला याज्ञवल्क्य गं.
→ सर्व कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता गणेश
…राव आहेत आजपासून माझ्या जीवनाचे परमेश.
पूजिला गौरीहार दिला आशीर्वाद
…च्या प्रवेशते संसारात निर्विवाद.
→ सप्तपदीच्या सात पावलांनी मार्ग आक्रमिते नवजीवनाचा
…च्या संसारात आशा करते आनंदाच्या.
→ वृक्षवेलींच्या सान्निध्यात देहभान हरपते,
…चे नाव घेऊन आशीर्वाद मागते.
→ मंगलदिनी दिला सर्वांनी प्रेमाचा आहेर,
…च्या करिता सोडते आज माहेर.
संसाराच्या वेलीवर येतो मोहोर प्रीतीचा
…चे नाव घेऊन निरोप घेते सर्वांचा.
→ राधेच्या मनात कृष्णाचे चिंतन
…चे नाव घेऊन सोडते मी कंकण.
→ सत्यनारायणाची केली पूजा, घेतला भक्तीने प्रसाद
…च्या साठी मागितला आशीर्वाद.
→ संध्याराणीने रेखिली चंद्राची कोर
…च्या साठी मी पूजिली मंगळागौर.
→ अश्विनीच्या तेजाने फुलली वसुंधरा
…चे नाव घेते आज आहे दसरा.
→ विजयाचे तोरण उभारले चैत्रप्रतिपदेच्या दिनी
…नी घातले मंगळसूत्र अन् झाले मी सुवासिनी.
→ चांदण्याच्या फुलांनी सजले आकाशाचे ताट
…नाव घेते सोडा माझी पाठ.
→ मांगल्याच्या तेजाने अजळतो देव्हारा देवाचा
…च्या संसारात फुलो फुलोरा सौख्याचा.
शब्द सुमने गुंफून तयार होते काव्यमाला
…चे नाव घेते ….ची बाला.
प्रीतीवीणा छेडिता होतो अनुरागाचा झंकार,
…चा करिते सुखाने संसार..
Marathi Ukhane for Females and Males:
→ प्रीतीवीणा छेडिता होतो अनुरागाचा झंकार,
…चा करिते सुखाने संसार.
→ मेघाचा वाजे मृदुंग, विजेच्या चाले नाच,
…राव म्हणतात गुपचूप ‘दासबोध‘ वाच.
→ वसंताच्या आगमनाला कोकीळेची साद,
… च्या संसारात यावा सौख्याचा नाद.
→ वसुंधरा सजते येताच श्रावणाच्या सरी,
…चे नाव घेते …च्या घरी
→ अंबरठ्याचे माप ओलांडून,
…च्या घरची झाले सून,
….ची गृहलक्ष्मी झाले भाग्य कोणते याहून.
→ सौख्य प्राप्तीसाठी धरावी उद्योगाची कांस,
साऱ्यांच्या आग्रहास्तव घालते ….ना जिलबीचा घास..
→ शांतता आणि समता हेच नेहरूंचे धोरण,
….चे नाव घेते हळदीकुंकू हेच कारण.
१९४७ साली भारताचा झाला स्वातंत्र्यसोहळा,
…रावांनी लावला मला सौभाग्य टिळा.
→ अंदमान बेटात सावरकरांना झाली शिक्षा
…नी घातली मला सौभाग्याची भिक्षा.
परस्पर सौख्यासाठी असते पती-पत्नीचे सर्वस्व अर्पण,
देव ब्राह्मणांच्या साक्षीने ….ना केले मी जीवन अर्पण.
→ कर्तव्याच्या तारका चमकतात आपत्तीच्या ढगात
…ची गृहलक्ष्मी होऊन आले नव्या घरात.
प्रीत देई पाणी जीवनाच्या वल्लरीला,
…ची पत्नी झाले, भाग्य आले फळाला.
सद्गुणाच्या कोंदणात सौंदर्याची शोभा
…च्या जीवनावर पसरे चैतन्याची प्रभा.
→ सुखसमृद्धी मंदिराला समाधानाचं सोपान
…च्या दीर्घायुष्याचे मला मिळो वरदान.
Ukhane in Marathi for Female:
वस्त्र शृंगारी शरीर, आरोग्य शृंगारी अंतर
…च्या चरणाची सेवा घडो निरंतर.
→ पुष्प तेथे गंध, भाव तेथे कविता
…च्या जीवनाशी एक झाली, जशी सागराची सरिता.
→ भावनेत जन्मली कल्पना, फुले गुंफिली शब्दांत
…च्या पत्नीला लाभो अखंड सौभाग्य जन्मजात.
→ संसाराच्या नौकेवरती पती असावे पत्नीचे साथी
… चे नाव घेता मी होई त्यांची जन्मोजन्मीची सोबती.
→ वाणीत असावा खडीसाखरेचा गोडवा
…चे नाव घेते आहे आज पाडवा.
चैत्रगौरीला वंदन करून मागते सौभाग्यदान
…चे नाव घेऊन राखते तुमचा मान.
→ सती सावित्रीचे पूजन करून वडाची करते पूजा
च्या दीर्घायुष्याशिवाय आशीर्वाद नको दुजा.
→ आनंदाच्या अर्मी घेऊन दसऱ्याचा आला सण
…च्या सौख्यासाठी अखंड तेजो जीवन.
व्हाल निःशंक मन, पाहून कन्येचा थाट
…ची भार्या सोडे, दादा वहिनी गाठ.
हृदय मंदिरात दिवा तेवो प्रीतीचा,
…चा संसार होवो सुखाचा..
हृदय मंदिरात दिवा तेवो प्रीतीचा
…चा संसार होवो सुखाचा.
→ माहेरचे संस्कार अन् सासरचे वातावरण
…च्या संसाराचे करीन मी नंदनवन.
→ संसारवृक्षाला येवो बहर प्रीतीचा
…च्या मुळे ठेवा लाभला सौख्याचा.
→ विवाह मांगल्यामुळे दोन जीवांचे घडते मीलन
…चे नाव घेऊन सोडते मी कंकण.
→ प्राजक्तांच्या कळ्यांना सुगंधी वास
…ना घालते करंजीचा घास.
नाशिकच्या गंगेचा चिरेबंदी घाट
…चे नाव घेते, सोडा माझी गाठ.
स्त्रियांच्या जातीने काम करावे शक्तीपेक्षा युक्तीने
…चे नाव घेते प्रेमभावे भक्तीने.
→ स्वच्छता नी टापटीप आरोग्याचे मूळ
…च्या जीवनासाठी सोडले चे कूळ.
→ देवाची मूर्ती घडविताना आनंदीत होतो शिल्पकार
…ची सेवा हाच माझा अलंकार.
→ सुशील सद्गुणी घरात लक्ष्मी करते वास,
…ना घालते फेणीचा घास.
→ औरंगाबादला प्रसिद्ध आहे वेरूळ अजिंठा लेणी,
…ना घालते घास दूधफेणी
कवीच्या परिचयात भावनांची उपरती
…चे प्रेम हीच माझी संपत्ती.
→ जमीन दुभंगून सीता झाली गुप्त
…ना वरून आईवडिलांना केले मुक्त.
Marathi Ukhane For Female Funny:
→ चतुर्थीच्या दिवशी निवडते दुर्वा
…चे नाव घेते आशीर्वाद द्यावा.
→ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र असतो आकाशात
…ची कीर्ती पसरो जगात.
→ निसर्गाच्या अंतरंगात पावित्र्याचा सुवास
…च्या जोडीने करिते आयुष्यभराचा प्रवास.
→ हिंदमातेच्या हातात रत्न जडावाचे तोडे
…चे नाव घेते वडील माणसांपुढे,
→ माहेरच्या परिसरात वेचले मी ज्ञानकण,
…चे नाव घेते लक्षात असू द्या सर्वजण.
→ दिल्लीचे सिंहासन, पेशव्यांनी फोडले
…च्या जीवासाठी माहेर मी सोडले.
→ नंदनवनात करिते कोकीळा कूजन
…चे नाव घेते झाले लक्ष्मीपूजन.
द्वारकेचा राजा पाठीराखा द्रौपदीचा
…ना घास घालते साखर – भाताचा.
ताजमहाल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल
…चे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.
→ वसंतऋतुमध्ये जशी येते कोकीळेची चाहूल,
तसेच मी टाकते …च्या घरांत पाऊल.
लक्ष्मी शोभते दानाने, विद्या शोभते विनयाने,
… च्या संसारात मी राहते मानाने.
→ लक्ष्मी शोभते दानाने, विद्या शोभते विनयाने
… च्या संसारात मी राहते मानाने.
हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे
…चे नाव घेते सर्वांच्या पुढे.
→ फुलांची वेणी गुंफितो माळी
…चे नाव घेते संध्याकाळच्या वेळी..
रातराणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित
…ना आयुष्य मागते प्रेमासहित.
कन्या होते माहेरी, सून म्हणून आले सास
….पती मिळाले भाग्यवान ठरले मी खरी.
मानपानासाठी खोटेपणा नसावा
…च्या पत्नीने हाच नियम पाळावा.
→ रामचंद्रागत पुत्र जन्मला कौसल्येच्या कुशी
…चे नाव घेते आनंदाच्या दिवशी.
पहिल्याच दृष्टिभेटीत पटली जन्मोजन्मीची खूण
…चे नाव घेते सर्वांचा मान राखून.
प्रेमळ माहेर सोडताना पाऊल झाले कष्टी
…च्या जीवनात होवो सुखाची वृष्टी.
→ निर्मळ प्रेमाखेरीज नाही कशाची हाव
…आजच्या शुभदिनी चे घेते नाव.
जिलेबीचा गोड घास सर्वांच्या मुखी
…च्या शीतल छायेत मी आहे सुखी.
→ शुक्राची चांदणी गुप्त झाली ढगात
….चे नाव घेऊन सांगते मी आहे सुखात.
→ शेषाच्या फणीवर श्रीविष्णू झोपले सुखात
…च्या जीवनात प्रीतीची ज्योत प्रशांत.
वामन पंडितांची कविता, मोरोपंतांची आर्या
…ची आज मी झाले भार्या.
प्रेममय सहजीवनात मुटु भावनेचा बंध
…च्या मुळे संसाराला बकुल फुलांचा सुगंध.
अखंड नंदादीप देवापुढे तेवतो,
…चे नाव घेणे सुखाचा क्षण वाटतो.
चंदनाच्या झाडावर लक्ष्मी घेते विसावा
…चे नाव घेते थोरांचा आशीर्वाद असावा.
घरात असावे अंगण, त्यात असावी तुळस
…च्या जीवनावर चढवीन आनंदाचा कळस.
संसाररूपी सागराला सुखदुःखाची सावली
…ना जन्म देणारी धन्य ती माऊली.
पुण्याच्या गणपतीपुढे पसरले केवड्याचे पान
…चे नाव घेऊन राखते तुमचा मान.
सहस्त्रदल कमळात लक्ष्मीचा वास
…चा लाभो प्रेमळ सहवास.
नेत्रांच्या निरंजनात प्रीतीची लावते वात,
…च्या बरोबर संसाराला करते सुरूवात.
नेत्रांच्या निरंजनात प्रीतीची लावते वात,
…च्या बरोबर संसाराला करते सुरूवात.
→ जाईजुईचा वेल मांडवावर चढे
…चे नाव घेते लक्ष द्या इकडे.
→ संसाररूपी दिव्याची प्रीती हीच वात
….ची आहे मला जन्मोजन्मी साथ.
→ जिजामातेच्या पोटी शिवाजीसारखा पुत्र
….च्या करिता घालते मंगळसूत्र.
दीनदुबळ्यांची करावी सेवा आंधळ्यांना वाढावी भाकरी
आजपासून मी करणार …रावांची चाकरी
जशी आकाशात चंद्राची कोर……. पती मिळायला माझे नशीब थोर.
Ukhane For Wife:
एक दिवा दोन वाली एक शिपला दोन मोती
अशीच राहु दे माझी व…रावांची प्रेम ज्योती.
सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले. …रावाचे नाव घेऊन मी सौभाग्यवति झाले
जिवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते सगळ्यांचा मान राखून नाव …चे घेते.
निळ्या निळ्या आकाशात शोभुन दिसतात चंद्र-तारे;
….रावांच्या संगतिने उजलेल माझे जिवन सारे.
काचेच्या बशित् आम्बे ठेवले कापुन
…रावांच नाव घेते सर्वान्चा मान राखून.
ताजमहाल बान्धायला कारागिर होते कुशल …रावान्च नाव घेते तुमच्यासाथि स्पेशल.
सांजवात लावताना येते माहेरची आठवण— रावांसाठी झाली सासरी पाठवण.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
….चे नाव घेते पत्नि या नात्याने.
राजहंस पक्षी मोति पोवल भक्षि …चे नाव घेते सर्व आहेत साक्षि.
सूपभर सुपारी निवडू कशी, गळ्यात माळ वाकु कशी, पायात पैंजण चालू कशी…….. बसले मित्रपाशी, कपाटाची चावी मागू कशी..?
साडीत साडी परागची साडी… अमुकरावांना बाबानी दिली मारुतीची गाडी.
कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार… आमुकरावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार.
मंगळसुत्राचे २ डोरले, एक सासर अन दुसरे माहेर, …रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
सुखद वाटते हिवाळ्यातले ऊन… रावाचे नाव घेते… ची सुन.
श्रावणात पडतात सरीवर सरी …रावांचे नाव घेते हि बावरी.
रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित, मागते आयुष्य …च्या सहीत.
भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे रक्षाबंधन, …ना करीते मी रोजच वंदन.
भारतीय नारी पतिला देते उच्च स्थान …चे ठेवीन सदोदित मान.
आईच्या वेलीला आलाय बहार, …ना घातला २७ फेब्रुवारीला हार.
नवरीसाठी मराठी उखाणे:
मुर्तीकाराने घडवली सुंदर मुर्ती, विलासरावांची वाढो सर्वदूर किर्ती.
ओम या शब्दात आहे दिव्य शक्ती….. रावांवर करते मी अमर प्रीती.
दैंन्दिन जीवनात सुद्धा भगवतगीतेला आहे महत्त्व, रामरावांसह मी करीन काहीतरी दिव्यत्त्व.
सौभाग्याचे काळे मणी घातले गळा….च्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा.
अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला….चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला.
एक तीळ सातजण खाई …ना जन्म देणारी धन्य ती आई.
चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी…च्या बरोबर केली सप्तपदी.
संसाराच्या सारीपटावर पडले सौभाग्याचे पान…..चा राहो चोहीकडे मान.
नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती ….ची झाले आज मी सौभाग्यवती.
फुल आहे गंध भाव आहे अंतरी …सह चालले सातपावलांवरी.
आणखी उखाणे हवेत? वाचा हा Blog- MARATHI UKHANE FOR WEDDING