Makar Sankranti Ukhane Marathi | संक्रांतीचे उखाणे

makar sankrantiche ukhane

Makar Sankranti Ukhane:

महाराष्ट्रामध्ये संक्रांतीच्या दिवशी उखाणे घेण्याची जुनी परंपरा आहे. त्या साठीच आज मी तुम्हाला Makar Sankranti che Ukhane घेऊन आलो आहे.

प्राचीन काळापासून, दानवे मानवांना तसेच देवतांना त्रास देत आली आहेत. जेव्हाही अशी परिस्थिती उद्भवते, तेव्हा देव अवतार घेतात आणि दानवांचा वध करतात. संक्रांती या देवतेने या दिवशी संक्रासुर या राक्षसाचा वध केला असे म्हटले जाते. मकर संक्रांती हा आपापसातील मतभेद दूर करण्यासाठी आणि आपल्यातील प्रेम (प्रेमभाव) वाढवण्यासाठी साजरी केली जाते. आध्यात्मिकदृष्ट्या, हा दिवस साधना आणि चैतन्य वातावरणात धारण करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे.

tilgul ukhane

तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा
……रावांचे प्रेम लाख रुपये तोळा.

तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान…
…रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण.

तिळाच्या लाडू सोबत देते काटेरी हलवा…
…..चे नाव घेते त्यांना लवकर बोलवा.

पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनानी असावे श्रीमंत,
…..रावांच नाव घेते आज आहे मकर संक्रांत.

संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात,
….रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात.

makar sankranti ukhane

Makar Sankranti Ukhane Marathi:

तिळगुळाच्या देवी घेवी ने नात्यात वाढते गोडी
…..रावांची आणि माझी अखंड राहो जोडी.

सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडतो धुळ
….रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगुळ.

रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास
…रावांचे नाव घेते संक्रांतीला खास.

सण पहिला मकरसंक्रांतीचा
मान हळदी कुंकवाचा
मान सुहासिनीचा आणि
….चा जोडा राहो साताजन्माचा

tilgul ghya god god bola

संक्रांतीला मी सौभाग्य अलंकारणि नटते,
….रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते.

संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वान,
….राव मुळे मिळाला मला सौभाग्याचा मान.

माझ्या संसाराला नजर लागो कुणाची,
…रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी.

मकर संक्रातीचे उखाणे

घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण,
…रावांच नाव घेते संक्रांतीचे कारण.

तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत,
….रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाच गुपित.

निसर्ग निर्मितीच्या दिवशी सूर्यनारायण झाले माळी
…चे नाव घेते संक्रांतीच्या वेळी.

सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी
…रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी.

मोत्याची माळ सोन्याचा साज
…रावांच नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज.

तिला सारखा स्नेह गुळासारखी गोडी
…रावांच नाव घेते सुखी असावी जोडी.

मकर संक्रांती उखाणे 2023

तिळगुळ घ्या गोड गोड बोला
…रावांशी लग्न झाले वर्ष झाले सोळा.

संक्रांतीच्या सणाला सुगड्याचा मान
…रावांच्या नावावर देते हळदी कुंकाचा कुंकाच वान.

सात समुद्राच्या पलीकडे चाले राधा कृष्णाचा खेळ,
…रावांच नाव घ्यायला झाली संध्याकाळची वेळ.

संसार रुपी करंजीत प्रेम रुपी सारण
…रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकू चे कारण.

makar sankranti ukhane

FAQ About Makar Sankranti:

मकर संक्रांती या सणाबद्दल थोड़ी माहिती जी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल. (Makar Sankranti information in Marathi.)

मकर संक्रांती हा सण का साजरा केला जातो?

मकर राशीत सूर्याच्या प्रवेशाचा पहिला दिवस दर्शविण्यासाठी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो.

Why Makar Sankranti is celebrated?

Makar sankranti is celebrated for lord Suryadev. The end of winter and the beginning of the new harvest season are both celebrated during the Makar Sankranti festival. It is one of the very first celebrations that takes place throughout the year.

मकर संक्रांती हा सण कुठे-कुठे साजरा केला जातो? आणि कशा प्रकारे साजरा केला जातो?

मकर संक्रांती हा सण पूर्ण भारतभर साजरा केला जातो. तो विविध राज्यात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. देशातल्हाया वेगवेगळ्या भागात हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. पंजाब आणि हरयाणा मध्ये संक्रांतीच्या एक दिवस आधी लोहरी हा सण साजरा करतात. तामिळनाडू मध्ये हा सण पोंगल (Pongal) म्हणून ओळखला जातो. गुजरातमध्ये या सणाच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे.

मकर संक्रांतीला उखाणे का घेतले जातात?

मकर संक्रांतीला उखाणे हे हळदी कुंकू समारंभासाठी घेतले जातात. महाराष्ट्रात हि उखाणे घेण्याची फार जुनी परंपरा आहे.

मकर संक्रांत हा सण कोणत्या ऋतूत येतो?

मकर संक्रांत हा सण जानेवारीमध्ये म्हणजेच हिवाळा या ऋतू मध्ये येतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top