लग्नासाठी उखाणे शोधताय? तर तुम्हाला कुठेही जाईची गरज नाहीये. कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एका पेक्षा एक जबरदस्त मराठी उखाणे. जे ऐकून public 100% impress झालीच पाहिजे.
आधी मी तुम्हाला माझे 10 fav उखाणे देतो जे तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि जर समजा नाहीच आवडले तर blog पूर्ण read करा. कारण मी तुमच्यासाठी उखान्यांची खुप मोठी तयार केली आहे. आशा बाळगतो ती तुम्हाला आवडेल.
तर चला सुरू करूयात.
10 Best Marathi Ukhane for wedding:
1. जर तुमच्या रावांना chicken खुप आवडत असेल किंवा राव non vegetarian असतील, तर त्यांच्यासाठी हा एकदम perfect उखाणा आहे.
जरीच्या चोळीला सोनेरी बटन
…रावांना आवडते बटर चिकन.
2. पावसाला सुरु झाला कि सगळीकडे एकदम हिरवेगार दृश्य पाहायला मिळते. अशा या निसर्गरम्य वातावरणात घेता येऊ शकतो असा एक चांगला उखाणा:
पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.
3. आता हा पुढचा उखाणा लाडूंच्या शौकीन रावांसाठी. हा उखाणा घास भरवताना देखील घेतला जाऊ शकतो.
पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
… रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.
4. लग्नासाठी नवरी सुबक अशी मेहंदी हातावर काढते जे तिचे सौंदर्य आणखी वाढवते . अशा नटलेल्या नवरीला घेण्यासारखा हा पुढचा उखाणा:
तळहातावर मेंदी काढली, त्यावर साखर-पाणी ही शिंपडले,
…रावांचे मन, मी केव्हाच जिंकले.
5. कोणत्याही स्त्री ला तिचा नवरा हा कोणत्याही अलंकारापेक्षा कमी नसतो. तर हा पुढचा उखाणा नवऱ्याची तुलना ताऱ्या व हिऱ्यांसोबत करतो:
अवकाशात चमकतात तारे, जमिनीवर चमकतात हिरे,
… राव हेच माझे अलंकार खरे.
6. लग्नाचे वय झाले, प्रेमाची लागली चाहूल,
… रावांच्या जीवनात टाकले मी पाऊल.
7. झेंडूच्या झाडाला फूल येतात दाट,
…रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.
8. यमुनेच्या काठावर कान्हा वाजवितो बासरी,
…रावां बरोबर आली मी सासरी.
9.देवांचे देव ब्रन्हा विष्णु आणि महेश,
…रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.
10. मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
… रावांचे हेच रुप मला फार आवडले,
शुभवेळी शुभदिनी आली आमची वरात, …रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात
जिवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते सगळ्यांचा मान राखून नाव *** चे घेते.
मंद वाहे वारा, संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो …, …ची जोडी.
जाईजुईचा वेल पसरला दाट… बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ.
अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका …नाव घ्यायला सान्गु नका मी आहे कुमारिका.
एक होति चिऊ एक होता काउ …रावान्चे नाव घेते डोके नका खाउ.
साता जन्माच्या जुळल्या गाठी, … रावांच नाव घेते चालताना सप्तपदि.
राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा ….च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा.
तुळजा भवानीचि क्रुपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद,
माहेरचे निरान्जन आणि सासरची फूलवात,
…रावाचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात.
मुबईची महालक्ष्मी, कलकत्याची कालिका, …चे नाव घेते …चि बालिका.
मैत्रि आणी नाल्यात नसावा स्वार्थ …मुळेच माझ्या जीवनाला अर्थ.
मनी असे ते स्वप्नी दिसे, ओठी मी हे आणू कसे, …माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे.
English मध्ये पाण्याला म्हणतात वॉटर ……. नाव घेते ….. ची सिस्टर.
साडीत साडी परागची साडी… अमुकरावांना बाबानी दिली मारुतीची गाडी.
लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास, …चे नाव घ्यायला आजपासुन करते सुरवात.
लग्नात्त लागतात हार आणी तुरे… च्या नाव घेण्याचा आगृह आता पुरे.
अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा,
आणि असेच सदैव आणि …च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा.
बारिक मणी घरभर पसरले, …साठि माहेर विसरले.
तुमच्यापावलांवर पाउल ठेवून मी सप्तपदी चालले आणि…….. .नाथा मी तुजीच जाहले.
शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने,. …रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने.
हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना
…हाचं माझा खरा दगिना.
थोरातांच्या दुधावर येते जाड साय, …ना जन्म देणरी धन्य ती माय.
ग. दी. माडगुळकरांचे रामायण सुधीर फडक्यांनी गायिले …रावां करिता मी पुणे पाहीले.
मानवाने करु नये कुणाचा हेवा, प्रकाशराव म्हणतात करावी सर्वाची निस्वार्थाने सेवा.
चंदनासारखे झिजून करावी सर्वांची सेवा, म्हणतात करु नको कधी दुसर्याचा हेवा.
सुहासिनीने करावे नेहमी सोळा श्रृंगार …आहे माझे प्रेमळ भरतार.
माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले, म्हणून…… रावांची मी सौभाग्यवती झाले.
विवाह म्हणजे सुरुवात एका नव-जीवनाची…. चे नाव घेउन जाणीव ठेवीन स्त्री कर्तव्याची.
फुलले गुलाब गाली, स्पर्शात (डोळ्यात) धुंद झाली प्रीती…ची झाले भी जन्मोजन्मीची सौभाग्यवती.
संकेताच्या मीलनाकरीता नयन माझे आतुरले…ची मी आज सौभाग्यवती झाले.
ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे …सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.
गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मी सुबक मेंदी…..चे नाव घेण्याची वारवार येवो संधी.
मात्यापित्यांच्या छायेत फुलासारखी वाढले, आजच्या दिनी.
…च्या चरणावर जीवनपुष्प वाहिले.
संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले, प्रत्यक्षात …चे आज मी जीवनसाथी झाले.
चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी…च्या बरोबर केली सप्तपदी.
साथीने रंगते गाणे, गाण्याने रंगते मैफल, …. च्या संगतीनं संसार करीन सफल.
प्रथमभेट ती नजरांची दोन ध्रुवांच्या मिलनाची …मुळे त्रुप्त (धुंद) जाहले, अंतरी फुले फुलली प्रीतीची.
कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे, …सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.