Agri Koli UKHANE FOR Wedding:
आगरी कोळी लोकांसाठी बनवलेले हे aagri koli ukhane तुम्हाला नक्कीच आवडतील. आपल्या रायगड, ठाणे आणि मुंबईची शान म्हणजे आपले आगरी कोळी बांधव आणि त्याची लग्न म्हणजे जणू भला मोठा उत्सवच. आणि लग्नांमध्ये उखाणे तर आगदी आग्रहाने घेतले जातात. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी आणले आहेत आगरी कोळी उखाणे.

“सुकलेल्या मच्चीचा केलाय मीनी रस्सा,
-Vinayak Mali
तुझ्या बापासनी नाय दिली पोर, तर पकडीन मी त्याचा घसा.”
खारघरचे मैदानात खेळत होतो मी क्रिकेट,
….ला बघून परला माझा विकेट.
कोकणात आहे झुळझुळनारा समुद्र, त्यावर आहेत लाटा,
… रावांच नाव घेत, मला काही येत झाटा.
सागर ना मासळी हाय आगरी कोळ्यांची शान,
….रावांना हाय ….गावानं जाम मान.
खायला आवडत, मला खाडीची मासळी,
….आहे नाजूक जशी, गुलाबाची पाकळी.
कालच्या वलगनीत भेटल्या चिम्बोऱ्या नि म्हावरे.
माझ्यासाठी …राव होतात चावरे बावरे.
Romantic aagri koli ukhane:
सुरमई, पापलेट, कटला,
माझा ….मला एका झटक्यात पटला.
गळ्यान सोन्याची गंठन, घालून मी मिरवीन,
…. ला आजपासून मी, स्विफ्ट मधून फिरवीन.
दाराच्या बाहेर सुकवत ठेवल बोंबील,
…राव तोंड करा इकर, नायत घशान कोंबील.
उरण जेटीवर भेटतो जाम भारी म्हावरा,
… रावांना आहे लग्नाची जाम घाई, कोणीतरी त्यांना सावरा.
एकविरा आई आहे, आमची दैवत,
…. रावांशिवाय आता मला नाही करमत.
आगरी कोळ्यांच्या मुखात नेहमी असते एकविरा आईचे नाव,
… रावांचे नाव घेते, अखेर आली त्यांच्या गाव.
अलिबागच्या समुद्रान पाटलांची होरी,
एकविरा आईच्या कृपेने सुखी राहो, _____ आणि _____ ची जोरी.

Funny & Comedy Aagri Koli ukhane:
…. तुझा तूप जणू चंद्राची कोर,
पहिल्याच भेटीन माझ्या जीवाला लावून गेलीस घोर.
कार्ले डोंगराव हाय माझे एकविरा आईचा स्थान,
….रावांचा नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.
काल घरी आणले होते पापलेट आणि म्हावरे,
….राव आहेत, माश्यासाठी खूप हावरे.
आशी बापसा शिवाय मी राहू कसा,
…तुझे नादान झालोय, मी येरा पिसा.
खायला आवरत मना चन्याची डाल,
…च्या मांडीव खेळविण एका वर्षान बाळ.
दारूचे ग्लासान भरला लिंबू सरबत,
… शिवाय मना नाय करमत.
सका सकाळी करत देवाची पूजा,
…चे जीवावर मारीन मी मजा.
Helicopter helicopter ….. माझी बायको chapter.
…ने पेरला लसून, …नि नेली मला गारीन बसून.
काय मग कसे वाटले आमचे आगरी-कोळी उखाणे? एकदम फाडू ना?
आता लगेच जाऊ नका. हा पोस्ट सुद्धा read करा: Aagri Koli Status

