Long Ukhane In Marathi For Female:
तर मित्रानो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मोठे आणि लांब लचक पारंपारिक उखाणे (Mothe Ukhnae). हे उखाणे तुम्ही कोणत्याही लग्नात किंवा सणा सुदीला घेऊ शकता.
पूर्वी बायका मोठे उखाणे घेत असत. त्याला जानपद असे म्हणत. त्या आधारावरच मी काही उखाणे तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी तुम्हाला देणार आहे. हे उखाणे थोडे मोठे आहेत पण मला खात्री आहे तुम्हला नक्कीच आवडतील.
निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे,
नाव घेते प्राची लक्ष द्या सारे.
नाव घ्या नाव घ्या नाव घ्यायचं
नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं
साध्या वरण-भातावर साजूक तूप घालायचं
सुषमा डोंगर दिवेना आता सासुबाई म्हणायचं
छोटी छोटी म्हणत घरभर फिरणारी त्यांची बहीण आता नणंदबाई चा तोरा गाजवणार
बबन रावांच्या लेकराचा सांभाळ करण्याचा मी प्रयत्न करणार
नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं
नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं
साध्या वरण-भातावर साजूक तूप घालायचं
रोहित रावांच नाव घेत डोंगरदिवेच्या घरात enter व्हायचं
Shopping Cha Motha Ukhana:
मैत्रिणी म्हणाल्या… मैत्रिणी म्हणाल्या चलतेस का ग शॉपिंग ला?
मी म्हटलं नको ग बाई शॉपिंग ची मुळीच आवड नाही मला.
बळजबरी म्हणाल्या चल चल,जबरदस्ती चढवली मी पायात चप्पल.
उगाच खर्च नको म्हणून पाकीट मी रिकामच घेतलं…
उगाच खर्च नको म्हणून पाकीट मी रिकामच घेतलं
पण हळूच purse मध्ये मी Credit Card टाकल.
आता शोप्पिंग म्हटलं कि लक्ष्मी रोड, लक्ष्मी रोड म्हटलं कि गाडगे सराफ.
घाडगे सराफांकडे.मी घेतलं मंगळसूत्र चार टोळ्यांच आणि दुकान गाठलं चितळ्यांचं.
चितळ्यांकडे घेतली भाकरवडी आणि स्वामिनीच्या दिशेने वळवली गाडी.
स्वामिनीत घेतली मी पैठणी आणि तुळशीबागेत केले मी घेण्यासाठी फनी
तुळशीबागेत घेतले फनी टिकल्या कानातले वेल तेवढ्यात आठवला लुंकडचा सेल.
बाई बाई लुंकडच्या सेलमध्ये काय ती गर्दी म्हणून उरकून घ्यावी वामातली खरेदी
वामा खरेदी मुळीच नाही केली मी फार दोन टॉप, एक pant कुर्ते घेतले फक्त चार.
आता मात्र पोटात व्हायला लागली काव काव, बेडेकर मिसळीवर चांगलाच मारला ताव.
क्रेडिट कार्डच लिमिट संपलं आणि घर मला गाठावं लागलं.
नितीन राव म्हणाले ….नितीन राव म्हणाले राणी.. झाल का ग मनाजोक्त शॉपिंग?
मी म्हटलं कुठलं हो Tanish मधनं घ्यायची राहिली की हो डायमंड रिंग.
खणखण कुदळी,
मण मण माती,
मण मातीच्या उभारल्या भिन्ती, चितारले खांब,
सासुबाईच्या पोटी, आक्काबाईंच्या पाठी,
उपजले राव, राव नाही म्हटलं, नाव नाही घेतल;
३२ पानं ३२ सुपारी तोंडात
विडा बोलु कशी?
सदर दाराची नजर पुरुषाची
सदरेला उभी राहू कशी
येत होते, जात होते, घड्याळात पाहात होते,
घड्याळात वाजले तीन
…ची वाट पाहाते ….ची सुन.
हंड्यावर हंडे सात
त्यावर ठेवली परात
परातीवर ठेवला भात,
भातावर वाढले तुप
ते झाले खुप,
म्हणून नेले पंढरीला,
पंडुरंगाच्या दर्शनाला येताना आणले खण ३,
आई म्हणे मला,
नणंद म्हणे मला
….म्हणे मी तुझ्यासाठी आणुन केला गुन्हा.
झुन झुन झाते
खिडकीतून पाहते,
खिडकीला तीन तारा,
अडकी त्याला मोती बारा
पान खाते करारा
घाम येतो दरारा
काढते पदर घालते वारा,
तिकडून आला व्यापारी
त्याने दिली सुपारी
सुपारी देते वाण्याला
हंडा घेते पाण्याला
पाणी आणते रंगाचे
वाडे बांधते भिंगाचे
वाड्यात वाडे सात वाडे
सात वाड्याला सात दारे
सात दारांना सात कुलपे
सात कुलपाना सात किल्ल्या
उघडून बघते आत
घरात मधगर
मधगरात पलंग
पलंगावर गादी गादीवर उशी
उशीवर वाटी वाटेत साखरेचे खडे
लेते मी सौभाग्याचे चुडे
सौभाग्याचे चुडे लेताना केली मी खटपट
बसायला घेतली पटपट
पहिल्यांदा पाहिले शिराळ
शिराळ्यात पिकतो चुना
दाखवले स्टेशन पुणा
स्टेशन पुण्याची काय सर
दाखवले मुंबई शहर
मुंबई शहरात मिळतात मासिके
दाखवते नाशिक शहर
नाशिक मध्ये मिळतात फुलांच्या वेण्या
दाखवल्या अजिंठा वेरूळच्या लेण्या
अजिंठा वेरूळच्या लेण्या फिरताना रुपये लागतात पाच
दाखवला विरुजेचा कैलास
विरुजेचा कैलास फिरताना हरवला छल्ला
दाखवला देवगडचा किल्ला
देवगडच्या किल्ल्यात धरते उपवास
उपवासाला केली भगर
दाखवले अहमदनगर
अहमदनगरात बांधला हर्षी
दाखवली बार्शी
बार्शीत दिली किल्ली
दाखवली दिल्ली
दिल्लीत करते विमान
विमानाने धरला सूर
दाखवले कोल्हापूर
कोल्हापूर शहराला महालक्ष्मी मंदिर
महालक्ष्मी मंदिराला सोन्याचा कळस
आणि ….रावांच नाव घ्यायला मला बिलकुल नाही आळस.
दागिन्यांचा पारंपारिक मोठा उखाणा:

सारवलेल्या अंगणात
सुंदर रेखाटली रांगोळी नाव घेण्याची आता माझी पाळी
लेक कोणाची……यांची
सून कोणाची…….यांची
राणी कोणाची भ्रताराची
भ्रतार म्हणे का ग रुसली मनी
जोडवे, बीचव्या, मासोळ्या, ,
पैंजन घाला हिला कोणी
बिलवर, पाटल्या, गोट, तोडे माझे भारी
पैठणची पैठणी मागवा जरदारी
टिक ठुशी मोहनमाळ गळा
जमलाय येथे सुहासिनींचा मेळा
सुवासिनीचे लेणे मंगळसूत्र
अन काळीपोत सासर माहेरच माझ्या
जमलय गणगोत बुगडी, वेल आणि कुड्या
यांच्या जिवावर नेसते मी रेशमी साड्या
खोप्यावर गुलाबाचे फुल
नाकात नथनी तिला मोत्याचं डुल
मोहन माळ, लक्ष्मी हार आणि घातली गळ्यात ठुशी
यांच्या खुशीतच माझी खुशी
लफा, कोल्हापुरी साज आणि जळगावची वाकी
…रावांच्या संसारात कुठलीच हाऊस राहिली नाही बाकी
लेक वाचवा (Save Girls/ Beti Bachao) या विषयावरील मोठा उखाणा:
लग्नाची मारले जाते गाठ
संसाराची गाडी होते स्टार्ट
वंशवेल वाढण्याची येथे वेळ
मुलगा असेल की मुलगी याचा मनात चालतो खेळ
मुलगी चे पहिल्या वेळी होते स्वागत
पण दुसऱ्या वेळी मुलग्याचे असते अवगत
मग केले जाते गर्भलिंग
निदान मुलगी असेल तर तिला दिले जात नाही जीवदान
येथे आईच घेते मुलीचा बळी
पोटातच मारून टाकते तिची कळी
अग जागी हो आई कशाला हवाय तुला वंशाचा दिवा
कर जरा मनात विचार तो नवा
दिवा लावण्यासाठी लागतात वाती
पण त्याची करताय बघा तुम्ही माती
सारा जुन्या विचारांना मागे
मोठ्या मनाने करा मुलींचा स्वीकार
त्याही करतील तुमच्या कुळाचा उद्धार
त्याही होतील तुमच्या जीवनाचा आधार
म्हातारपणी करतील प्रेम आणि तुमचा सांभाळ
बघा तुमच्या आनंदाला ठेंगणे पडेल हे आभाळ
म्हणूनच या विचाराने बदलूया आजचा काळ
लेखी च्या गळ्यात घालून प्रेमाची माळ
नका तोडू आता उमलणारी कळी
…रावांच नाव घेते उखाणे स्पर्धेवेळी.
झाडांची नावे वापरून बनवलेला मोठा उखाणा:
झुळ झुमराच
फुल उंबराचं
लाटन पिंपळाच
सुझी गव्हाची
बहिण भावाची
लेख कोणाची?
आईबापांची
सून कोणाची?
सासू-सासर्यांची
राणी कोणाची?
भरताराची
एवढ्या अटी कशासाठी?
नेसायला दिली जरी काठी
बसायला दिली पानपट्टी
मोठ्या पोहळ्याने भरली ओटी
मोठ्या पोहळ्याचा केला बाजार
रुपये आणले 3 हजार
तीन हजारांचा आणल करडू
करडू चा काढलं तेल
दाजीबा चा लगीन
वनजीच बाळंतपण
उरलंसुरलं शिक्यावर ठेवलं
शीक तुटलं मडकं फुटलं
लोंढा गेला महापुरी
महापुरातून आणला पैइकाम
आणि राहुल रावांचे नाव घेते सर्वजण ऐका.
प्रदूषण व पर्यावरण या विषयावरील मोठा उखाणा:
देवाने दिली होती आम्हा सर्वांना सुंदर निसर्गाची देणगी
पण मानवाने टाकली त्यातही नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अति वापराची ठिणगी
त्याचबरोबर वाढवलं प्रदूषणाचा मीटर
म्हणूनच तर रोगराई नी गाठलं आज शिखर
कमी होत चाललाय ओझोनचा थर
त्यातच पावसाच्या असमतोलतिची भर
ढासळत चाललाय पर्यावरणाचा तोल
या सर्वांचा सगळ्यांना कळणार कधी मोल
चला करूया नवनिर्मितीची सुरुवात
पेटवा सर्वांच्या हृदयात एक फुलवात
झाडे लावा झाडे जगवा पाणी आडवा पाणी जिरवा
त्यासाठी बांधत तुम्ही कळवा
म्हणजे निसर्ग होईल हिरवा हिरवा
रंग पर्यावरणात निर्माण होईल पूर्वीसारखाच गोडवा
आता मनाशी ठरवा व थांबवा या पर्यावरणाचा ऱ्हास
…रावांच नाव घेते तुम्हा सर्वांसाठी खास.
माहेरकडच्यानच्या नावाचा लांब उखाणा:
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील …माझे गाव
गावात आहे माडी
माडी वर नेसते साडी
साडीला लावते चाप आणि कृष्णकांत घोडके माझे बाप
अंगणात आहे जाई आणि … घोडके माझी आई
परसात आहे बाग
बागेत कोकिळा करते कुहू कुहू
आणि इंद्रजीत घोडके माझा भाऊ
दारात आहे आड
आडात आहे पाणी
श्रीलेखा घोडके माझी वहिनी
वरच्या माडीला आहेत काचा
आणि प्रज्वल घोडके माझा भाचा
अंगणात आहे तुळस
तुळशीजवळ मी रोज लावते अगरबत्ती
आणि मी आहे राहुल पवार यांची सौभाग्यवती.
Lamb aani Mothe Ukhane:
कोल्हापूर गाव चांगलं
चारी बाजूंनी चार बंगल
चौथ्या बंगल्याला चार मजले
चौथ्या मजल्यावर चार खोल्या
चौथ्या खोलीला चार दारे
चौथ्या दाराला चार हत्ते
उघडून बघते आज
जिरे फोडणीचा भात
भातावर तूप
तुपासारखा रूप
रूपा सारखा जोडा
चंद्रभागेला पडला वेडा
चंद्रभागेच्या पाच-पन्नास नावा
आधी आळंदी जावा
मग पंढरी जावा
आळंदीचे कुंकू
देहू तेकू
देहू चा मेवा
पंढरीत खावा
पंढरीचा बुक्का
देशात दहावा
देशाच्या बाभळा आणि कोकणातल्या फणस
फणसाचे गरे
खाताना लागतात बरे
राहुल रावांचे नाव घेताना तहानभूक हरे.
सणांचा मोठा उखाणा:
कोल्हापूर गाव शहर
कोल्हापूर गाव शहर कडेने बारा वेशी
बारा वेशीवर बारा बुरुज
बारा बुरुजावर बारा तळी
कडेने शंभर साठ बळी
बळीच्या तोंडात मोत्याचा चारा
नवस करते शंकर सारा
शंकर साराला धाडते पत्र
नागपंचमीचा आलं पौत
पंचमीचा पौत आल गौरी भवत
गौरीचा घेते दोर
आल शिलंगण म्होर
शिलंगणचं घेते सोन
आणि दोन्ही दिवाल्यानी केलं येन
दोन्ही दिवाल्यांच न्हाते पाणी
आणि संक्रांत आली तान्ही
संक्रांतीचा पुसते वसा
आणि नव्याची पुनावली चार दोन दिवसा
नव्याच्या पुनवेचा पुसते नव आणि शिमगा म्हणतो आलं थांब
शिमग्याची पेटवते होळी आणि घेते नव्या सालात उडी
उभी करून गुढी पाडव्याची गुढी
आकिती आली लाडी लाडी
आकीतीच पुसते कर आणि वर
बेंदूर आला म्होर
बेन्द्राचा पुसते बैल
आणि राहुल रावांची गाडी येईल तरचं येन जान होईल.
Mothe Ukhane For Females:
येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते
खिडकीला तीन तारा अडके त्याला घुंगरू बारा
भान घाते घरघर घाम येतो झरझर
काढते पदर घालते वारा
तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी
सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला
खोल्यात खोल्या सात खोल्या, मधल्या खोलीत पलंग
पलंगावर गादी, गादीवर उशी
उशीत बशी , बशीत कप
कपात घड्याळ, घड्याळात वाजला एक
मी आहे अजितदादांची लेक.
तर मी आशा बाळगतो कि तुम्हाला हे आजचे Mothe Ukhane/Lamb ukhane आवडले असतील.
जर तुम्हाला Comedy Marathi Ukhane हवे असतील तर हा पुढचा blog नक्की read करा: