नवीन पिढीचे विनोदी आणि चावट उखाणे | Modern Marathi Ukhane

chavat ukhane

Modern Marathi Ukhane For Female:

उखाणे तर सर्वच घेतात, पण हे विनोदी आणि चावट उखाणे (Modern marathi ukhane) मात्र फक्त आजच्या तरुण पिढीसाठी आहेत. हे अफलातून खट्याळ आणि विनोदी उखाणे (funny ukhane) ऐकल्यावर तुम्ही पॉड धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत.
कृपया हे उखाणे असेच कुठेही घेऊ नका कारण हे adult ukhane आहेत. ज्यांची विनोदबुद्धी जागृत असेल अशाच लोकांसमोर हे उखाणे घ्यावेत. तर enjoy करा आता आपले हे चावट उखाणे.

कोरोनाच्या काळातच आमचा लग्न सोहळा झाला,
Social distance ठेउनच आम्ही हनीमून केला.

chavat marathi ukhane

वड्यात वडा बटाटावडा
…ने मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.

मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये संजू न दिली सर्वांना जादूची झप्पी
गणपतरावांचे नाव घेते द्या सगळ्यांनी एक एक पप्पी.

टोपली ठेवले होते आंबे ते गेले सडून,
मदन रावांच नाव घेते नाकातला शेंबुड  फुरकन वडून.

गोऱ्या गोऱ्या मुखड्यावर शोभतो काला काला goggle,
…. माझ्या प्रेमात झालाय पुरा पागल.

सप्तपदीच्या वाटेवर ….राव मी तुम्हाला साथ देईन,
पण तुमच्यासाठी एक शर्ट घेताना मात्र माझ्यासाठी दोन ड्रेस आन चार साड्या पण घेईन.

निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान
अन ….चे नाव घेते खाऊन तंबाखू पान.

सकाळी सकाळी नळाच भरते मी पाणी,
अन आरशात पहा …बाई दिसतेस डुकरावाणी.

लाल लाल ओठ तुझे गुलाबी आहेत गाल,
रोडवरून चालायला लागलीस कि काय दिसतेस तू माल.

modern ukhane marathi

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय
…. राव घरी परतले नाहीत, कुठे पिऊन पडले कि काय.

Bus stand वर लागलाय सेल अन साड्यांवर आहे म्हणे 10% ची सूट,
अन अक्ख्या गळीत ….बाई तू आहेस काळी कूट.

नव्या आयुष्याची नवी नवी गाणी, अन देशमुखाच्या घराण्यात आमची सासुबाई झाले राणी.

वाकडी तिकडी बाभुळ, तिच्यावर बसला होला,
सखा पाटिल मेला म्हनणून तुका पाटिल केला.

एक होति चिऊ, एक होता काऊ,
…ना घास भरवला तर मि काय खाऊ?

पनिपुरि खाताना लागतो जोरदार थसका
….ला आवडते बिस्कित ब्रितानिया मस्का चस्का.

अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
***हसतात गोड, पण डोळे वटारायची फारच खोड्.

जाऊनिया काश्मिरला साजरे केले हनिमुन
… चे नाव घेते … ची सुन.

romantic ukhane

दोघे मिळून पिचर पाहू साटम आणि
….तू दिसतेस एक नंबरची item.

उन्हात उभा राहिला कि हा दिसतो कावळा,
…सकाळी ५ वाजता याचा उभा राहतो बाहुला.

कुत्र्याला बोलवायचं म्हटलं कि बोलतात यू-यू , आणि
… तू मला खूप आवडतोस म्हणून मी बोलते I love You.

पहिला नापसंत केला कारण तो होता Tractor वाला,
म्हणून तुझ्यावर प्रेम केल तर तू निघाला Band वाला.

भर उन्हामुळे माझा रंग पडला काळपट,
काहो सासूबाई तुम्ही लहानपणापासूनच आहेत का अशा येडपट.

पौर्णिमेच्या चंद्रासारखा नवरा माझा चिकना बाई,
पण माझा birthday जर विसरला तर त्याची खैर नाही.

faltu ukhane

एवढ्या अटी कशासाठी,
मोत्यानी भरते ओटी
डोंगरावरून आणले फणस
फणसाचे काढले गरे
…रावांच नाव घेता तहानभूक हरे.

आत घर मात घर
घरात ठेवलाय पलंग
त्यावर ठेवली उशी
…राव बसले प्यायला
त्यांना हाक मारू तरी कशी.

New and Modern marathi ukhane:

बागेत बाग राणीची बाग
अन आज खायला घालून मिरचीची चटणी
…रावांच्या ढुंगनाची करते आग.

शेतात पेरलंय मुग
काढायला गेलते काल
अन माझ्या नवऱ्याच्या नादाला कोण लागेल,
त्याच ढुंगन मी करेन लाल.

केंद्रात केंद्र सोळा केंद्र
अन माझ्या नशिबी पडलंय काळ बेंद्र.

हंड्यावर हंडा,
हंड्यात चिवडा,
चांगला नवरा मिळावा म्हणून मी लय उपवास केले,
पण माझा ….निघाला बेवडा.

अग आई मी तुझ्याशी आता कधीच नाही भांडणार,
माझी बायको आली घरी आता तिच्याच माग हिंडणार.

काश्मीरला मिळतात सुंदर रेशमी रुमाल
अन …..सोबत असताना कशाला लागतो हमाल.

zavazaviche ukhane

पाऊस पडला कि ओढ्याच पाणी वाहत झुळूझुळू,
अन तुझा नवरा पळतंय त्या ….च्या माग हळूहळू.

पाहुणे आले कि उघडते मी दराचा खटका,
अन माझा नवरा त्या सरपंचाच्या शेतात जाऊन खेळतो मटका.

पोरगी बघायला आलेल्या मुलासाठी काही उखाणे:

पोरग बघायला येणार म्हणून पप्पानी मला काल नेल मार्केट ला अन घेऊन दिल सलवार सूट,
काहीपण म्हणा नामदेवराव पण तुमच पोरग लयच हाय काळ-कूट.

आलास पोरगी बघायला आता मुकाट्याने बैस,
आर तुझ्यापेक्षा तर भारी दिसते आम्झ्या पवार बाईंची म्हैस.

कामवाल्या बाईचा उखाणा :
मालकाचे कपडे मी धुतले चकचक,
म्हणून मालकाने मला खायला नेल बोकड,
अन तेव्हापासून मी कपडे धुवायला घरी गेले,
कि मालकीण थोबाड करते वाकड.

दुधवाल्याचा कॉमेडी उखाणा:
तुमच्या इकड एवड पिव्वर दुध देऊन झाली बघा माझी चूक,
दुधात पाणी टाकल म्हणता आणि किलो किलो न काढता तूप.

जावयासाठी उखाणे | Javay bapu sathi funny ukhane:

मार्केटमध्ये गेलो होतो काल आणलेत चपला अन बूट,
अन लवकर सांगा सासुबाई हागायला जाऊ कुठ.

बागेत फुलल्या गुलाबांच्या कळ्या,
जावयाचे दात म्हणजे दुकानच्या फळ्या.

हुंड्यात गाडी मिळणार म्हणून आतापर्यंत मी तुमच्या पोरीला दिली आहे साथ,
आणि जर मला गाडी मिळाली नाही तर तुमच्या ढुंगनावरच घालतो मी एक लात.

सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.

आमच्या सासूबाईनी बांधली ३ माजली माडी,
अन लग्नात मला घेऊन दिली Hero Honda गाडी.

मंदिरात गेलो कि वाजवतो मी घंटी,
अन आमच्या सासूबाईनी लग्नात केली मला ५ तोळ्याची अंगठी.

गेलो सासरी कि सासरा पाजतो माठातल पाणी थंडगार,
अन सासूबाईनी लग्नात मला गिफ्ट केली Maruti Car.

फिगर maintain ठेवण्यासाठी सासूबाई खाते dieting च्या गोळ्या,
अन सासुरवाडीला मी गेलो कि करते पुरण पोळ्या.

चावट उखाणे

डान्स करते झकास वाढवून sound चा bass,
अन गेलो मी सासरवाडीला कि भरवते लाडाचा घास.

तर मित्रानो, हे होते आपले modern marathi ukhane. आवडले ना? हे सर्व उखाणे एकदम नवीन (new ukhane) आणि trending आहेत.

तुम्हाला जर आणखी उखाणे हवे असतील तर हा पोस्ट सुद्धा रीड करा: Marathi Ukhane for Females

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top