आज मी सादर करत आहे आपल्या धार्मिक स्वभावाच्या मंडळींसाठी बनवलेले खास हिंदु संस्कृतीवर आधारित देवी-देवतांच्या नावाचे मराठी उखाणे. हे देव देवतांचे उखाणे तुम्ही सत्यनारायणाच्या पूजेसाठी किंवा इतर अनेक सणांच्या दिवशी घेऊ शकता.
महादेवाचे उखाणे/ शंकराचे उखाणे:
ब्रम्हा, विष्णू, महेश आहेत त्रिमूर्ती, _____रावांची पसरो जगभर किर्ती.
शिवाच्या पिंडीवर वाहते बेलाचे १०८ पान, _______रावांचे नाव घेते ______ गाव आहे छान.
शिवाच्या पिंडीवर करते पंचामृताचा अभिषेक, ______रावांचे नाव घेते आहे______ची लेक.
लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा, …च्या जीवावर कर्ते मी मजा.
गणपतीचे उखाणे | Ganpatiche Ukhane:
चतुर्थी ला वाहते गणपती ला २१ हराळी, _____रावांचे नाव घेते वैज्यनाथाचे गाव आहे परळी.
श्री गणेश आहे शिव पार्वती चा पुत्र,______रावांंच्या नावाचे घालते मंगळसुत्र.
साई बाबा चा मंत्र आहे ओम साई, _______रावांचे नाव घेते करू नका घाई.
महर्षी वाल्मीकी ने रचले रामचरीत्र,______ रावांचे नाव घेते राम आहे कौसल्येचा पुत्र.
जेथे सुख शान्ति समाधान तेथे लक्ष्मिचा वास …रावान्ना भरविते श्रीखंडाचा घास.
देव देवतांचे उखाणे:
श्रीकृष्णाचे उखाणे | uKHANE ON kRISHNA:
“श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य. आणि माझ्या संसारात होईल तुम्हा सगळ्यांचे नेहमी आदरातिथ्य.”
“अर्जुनाच्या रथाचे श्रिक्रुश्न करतो सारथ्य —-च्या ससारात होइल सर्वाचे आदरतिथ्य.”
“गीत गोविंदा श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास …चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास.”
“श्रावण महिन्यात सर्वजण करतात श्रवणी सोमवार….. सह केले मी हरिद्वार.”
“अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण करतो सारथ्य सोबत… करतो तुम्हा सगळ्यांचे आतिथ्य.”
“भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ… रावांशिवाय माझे जीवन व्यर्थ.”
“संतांचे वाङमय म्हणजे ‘सारस्वताचा सागर… आहेत प्रेमाचा आगर.”
“श्रीकृष्णाने लिहिली भगवतगीता …माझे राम तर मी त्यांची सीता.”
“श्रीकृष्णाने भगवतगीतेतून जगाला केला उपदेश…नी माझ्या जीवनात केला २७ मे ला प्रवेश.”
“जेजुरीचा खन्डोबा तुळजापुरची भवानी…रावाची आहे मी अर्धागीनी.”
तर कसा वाटला आमचा हा लेख? आवडला असेलच. आमच्या वेबसाईट वर तुम्हाला असे अनेक प्रकारचे उखाणे मिळतील.
तुमच्यासाठी हा आणखी एक Recommended Blog: दिवाळीचे उखाणे