दिवाळीला आपण वेगवेगळे फराळाचे पदार्थ करतो. आणि त्या पदार्थाची चव आणि गुणधर्म आपल्या घरातील व्यक्तींच्या स्वभावाला अगदी शोभेसे असते. आणि याच फारालातील पदार्थांचा सासर घरातील मंडळींची घातलेला मेळ आपण या उखाण्यात पाहणार आहोत. चला तर पाहूयात दिवाळीतील फराळाचे उखाणे. सुरु करूया एका मोठ्या उखाण्यापासून.
“आली आली दिवाळी
केली फराळाची तयारी
चकली केली चमचमीत
अगदी सरळ नंदूबाईंसारखी
ताटात हवी करंजी
गोडी स्वभावात सासरेबुवांसारखी
पदरावर पदर अनेक
पण गोड चिरोटे दिरांसारखे
गोडीला खमंग खुसखुशीत शेव
जाउबाईन सारखी ताटाची शोभा वाढवे
नुसतीच लुडबुड केली
गोड खुसखुशीत शंकरपाळीनी
जसे घर भरलेले दिसते
घरातील पोराबाळांनी
तिखट गोड आंबट चवीचा
सासूबाईंसारखा चिवडा
फराळाचे ताट नाही पूर्ण चिवड्याशिवाय
मानच आहे तो एवढा
मन लावून केला तुपातला बेसन लाडू
फराळाचा राजा तो कौतुक ते किती करू
कणाकणात साखरेचा गोडवा उतरला
जसा रावांचा स्वभाव माझ्या मनात भावला
नाही नाही म्हणत सगळे पदार्थ केले
माझ्या नावाचे काही करायचेच की हो राहिले
मग वाटले होऊ आपण फराळाचे ताट
सगळ्या पदार्थाना एकत्र ठेवायचा
मनानं घातलाय घाट
दिवाळी सणाला लक्ष्मीकडे मागते
सुखं, समृद्धी, उत्तम आरोग्य
आणि रावांचं नाव घेऊन मागते
लक्ष्मीमाते दे अखंड सौभाग्य”
-Written by Shubhmngal Savdhan
Diwali 2022 Ukhane:
दिवाळीत करू प्रज्वलित दीप
… रावा कडे आहेत एकशे एक टीप.

दिवाळीत करू प्रज्वलित दीप
…रावा कडे आहेत एकशे एक टीप.
– Diwali Ukhane for females.
दिवाळीत लावले आकाश कंदील
… राव झाले चकित बघून लाईट बिल.
दिवाळीला अंगाला लावावे सुघंदी उटण
… रावांच्या शर्टला लावते मी बटण.
दिवाळीत करावी फुलांची सजावट
… रावांना भाजी लागली खारट.
…. रावाना वाढत होते पुरणपोळीचे जेवण
दिवाळी सण आला हेच आहे कारण.
दारी रांगोळी काढली खूपच सुंदर
…. राव आहेत माझे एकच नंबर.
दिवाळीत घेतली नवीन कार
… रावांना आवडते चकली फार
दिवाळीत करावे लक्ष्मी पूजन
घरी आले … रावांचे cousin.
diwali 2022 Marathi wishes:
हातात घातला चुडा
गळ्यात काळ्या मण्याची सर
प्रेम करती मी … रावांवर.
दिवाळीला बनवली लाडू, करंज्या, पुरी
… राव माझे नेहमी दिसतात भारी.
दाराला लावते तोरण अन फुलांची माल
… राव आणि मी बनवते दिवाळीचे फराळ.
दिवाळीला बनवले जेवण स्वादिष्ट
… राव माझे खूप रागीष्ट.
घरात निघाली News Paper ची रद्दी,
… रावांसोबत करते दिवाळीची खरेदी.
उठा चला दिवाळी आली,
… रावांच्या अन माझ्या प्रेमानी बहरली.
उठा चला दिवाळी आली,
… रावांच्या अन माझ्या प्रेमानी बहरली.
Festival ukhane for couples.

सासरच्या घरात आहे पहिली दिवाळी,
… रावांच्या नावच सौभाग्याचं अलहंकार घालते मी गळी.
Diwali Sathi Ukhane:
दिवाळीच्या उत्सवाला आली खूपच धमाल,
…. रावांच्या कल्पकतेची आहे सगळी कमाल.
ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,
… रावांचे नाव घेते दिवाळीच्या दिवशी.
दिवाळी असते धूम फटाक्यांची
…रावांच्या अन माझ्या जीवनाची

दिवाळी असते धूम फटाक्यांची
…रावांच्या अन माझ्या जीवनाची.
Diwali 2022
पैठणीची पैठणी कोल्हापूरचा साज … रावांचं नाव घेते दिवाळी आहे आज.
कांजीवरम साडी बनारसी खन… रावांचं नाव घेते आज आहे दिवाळीचा सण.
गुळ, खोबर खमंग करंजीचे सारण …रावांचं नाव घेते दिवाळी सणाचं कारण.
लक्ष्मी माते पुढे ठेवल्या फुलांचा राशी … रावांचे नाव घेते खास दिवाळीच्या दिवशी.
दिवाळीच्या फराळात आवडती माझी शंकरपाळी …राव सोबत साजरी करते माझी पहिली दिवाळी.
दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पणती …रावांना ओवाळते पाडव्याच्या दिवशी.
मोत्याची माळ, सोन्याचा साज … रावांचं नाव घेते आज आहे दिवाळीचा सण खास.
दिवाळीच्या दिवसांमध्ये येतो पाडवा … रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा.