Best marathi ukhane for male:
राम राम मंडळी! कसे आहात? आजच्या या आपल्या “Marathi ukhane for males” blog मध्ये मी तुम्हाला नवीन नवीन नावरदेवाचे उखाणे (Navardevache Ukhane) देणार आहे. हे एकदम सोपे, सुंदर आणि छोटे उखाणे आहेत जे तुम्ही अगदी सहज पणे लक्षात ठेऊ शकता.
महाराष्ट्रात लग्नसमारंभ हे अगदी थाटामाटात साजरे केले जाते. आणि दोघे नवरा नवरीला नाव घेण्याचा जोरदार आग्रह केला जातो. आणि अशा वेळी जर उखाणा येत नसेल तर फाजेतीच समजा. मुलींचा तर प्रश्न येत नाही कारण मुलींना खूप उखाणे माहित असतात. खरी पंचायत तर मुलांची होते. म्हणूनच आजचा हा post खास मुलांसाठी आहे. मुलांना आगदी सहजपणे लक्षात राहतील असे सोपे नवरदेवाचे उखाणे मी आज तुम्हला देतो.
Marathi Ukhane For Bridegroom:
काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून …राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून.❤️
दही, साखर, तुप, माझी …मला आवडते खुप.
रोज सकाळि उठुन पितो भरपुर पाणी, आसावरी चे नाव घेता येते डोळ्यात पाणी.
कळी हसेल फुल उमलेल, मोहरून येईल सुगन्ध, …च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
Navardev Ukhane:
भाजित भाजि पालक, …माझि मालकिन अन् मी मालक.
निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट …चे नाव घेतो तुमच्यासाठी खास.
अमुआ कि डाली पर बोले कोयलीया….के संग बिते सारी उमरिया.
भाजीत भाजी मेथीची, ..माझ्या प्रितीची.
तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल…ला आवडते गावठी गुलाबाचे फुल.
झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी आयुष्यभर सोबत राहो…, …. ची जोडी.
Marathi Navardevache Ukhane:
दुधाचे केले दहि, दहयाचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा…….चे नाव घेतो …… रावान् चा पठ्ठा.
सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड… चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड.
पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक …आहे माझी फार नाजुक.
फुलासंगे मातीस सुवास लागे …. नि माझे जन्मोजन्मिचे धागे.
देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे…. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.
दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी…..चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.
वर्षाकाठचे महिने बारा …या नावात सामवलाय आनंद सारा.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम…ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
चान्दीच्या तबकात तुपाच्या फूलवाती… च नाव घेतो … च्या राती.
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न ११, घराला लावलि घंटी, … माझी बबली आणि मी तिचा बंटी.
अंतरिचे गीत उमटले, शतजन्मीचे नाते जुळले, …सह अंतरी प्रितीचे फुल फुलले (उमलले).
पाच बोटातून होते कलेची निर्मीती,. .ची व माझी जडली प्रिती.
दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या रेशिमगाठी…चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.
संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी …म्हणते मधूर गाणी.
काय मग पोरांनो, कसे वाटले तुम्हाला आमचे हे आजचे नावार्देवासाठी बनवलेले उखाणे? आवडले ना? मग निवडा या पैकी एखादा उखाणे आणि घ्या तुमच्या लग्नामध्ये.
जर तुम्ही मुलगी आसल आणि उखाणे शोधात असाल तर निराश अजिबात होऊ नका कारण तुमच्यासाठी देखील आम्ही खुप सारे उखाणे तयार केले आहेत जे तुम्ही खालील link वर click वाचू शकता:
MARATHI UKHANE FOR FEMALES | नवरी साठी उखाणे | BEST FEMALE UKHANE 2022